'कस्तुरी' परिसरात सोमवार दि. १ मे २०१७ रोजी आजी-आजोळ, नातवंड ह्यांच्या सहजीवनाचा प्रकल्प आजोळ करिता 'सेवासागर' या वास्तुचा लोकार्पण सोहळा आणि 'वारकरी भवन व भक्तनिवास' या नियोजित वास्तुचा भूमिपूजन सोहळा प.पू.श्री जितेन्द्रनाथ महाराज (श्री देवनाथ महाराज मठ, पिठाधिश्वर, सुर्जी अंजनगांव जि.अमरावती) यांच्या अध्यक्षतेखाली आणि मा.ना. डॉ. रणजीत पाटील (राज्यमंत्री तथा पालकमंत्री अकोला जिल्हा) मा.आ.श्री गोपीकिसन बाजोरीया, मा.श्री वसंतराव खोटरे (माजी आमदार) मा. श्रीमती जोत्सनाताई चोरे (जि.प.सदस्या) मा. सौ. उज्वलाताई देशमुख (माजी महापौर) ह.भ.प. श्री लक्ष्मीनारायणजी दायमा, ह.भ.प. श्री नाना उजवणे, मा. श्री सिध्दार्थ शर्मा (कार्याध्यक्ष, मराठी पत्रकार परिषद मुंबई) प्रा.श्री नितीन बाठे (अध्यक्ष, श्री समर्थ शिक्षण व क्रिडा प्रसारक मंडळ, अकोला) व मा.श्री दिपक भरतिया (वसंत अॅग्रोटेक इंडस्ट्रीज,अकोला) यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. त्याप्रसंगी घेतलेली क्षणचित्रे.