अकोला नगरीचे शिल्पकार व माजी नगराध्यक्ष स्व. विनयकुमार पराशर यांचे द्वारा स्थापीत अकोला जिह्वा सेवा समिती हि संस्था दरवर्षी समाजसेवेच्या क्षेत्रात उत्कृष्ठ कार्य करणाऱ्या व्यक्ती अथवा संस्थेस स्व. विनयकुमार पराशर स्मृती जीवन गौरव पुरस्कार प्रदान करून गौरव करीत असते.
कस्तुरीने स्थापनेपासून २०१८ पर्येंत अकोला शहर व परिसरातील निराधार व वंचितांच्या सेवेकरिता केलेल्या सेवाभावी कार्याची दखल घेऊन २०१८ या वर्षीच्या पुरस्कारासाठी कस्तुरी चॅरिटेबल सोसायटी या संस्थेस जाहीर करण्यात आला.
हा पुरस्कार संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रा. किशोर रामगोपाल बुटोले यांनी सेवा समितीचे अध्यक्ष डॉ. सुभाष तिवारी, सचिव महादेवराव हुरपडे व प्रसिद्ध कृषी कीर्तनकार श्री महादेवराव भुईभार व मान्यवरांच्या हस्ते अकोला येथील शिवाजी महाविद्यालयाच्या सभागृहात दिनांक १८/०३/२०१८ रोजी झालेल्या समारंभात स्वीकारला. पुरस्काराचे स्वरूप शाल, श्रीफळ,स्मृतिचिन्ह,सन्मान-पत्र व रोख रुपये ११०००/- असे होते.

पुणे व पिंपरी चिंचवड शहर व परिसरात समाजसेवेच्या क्षेत्रात मागील १५ वर्षा पासून कार्यरत सेवाभावी संस्था 'संस्कार प्रतिष्ठान'. या संस्थेने कस्तुरी च्या सेवाभावी कार्याची व संस्थापक प्रा. किशोर बुटोले यांच्या ३७ वर्षाच्या शैक्षणिक सेवेची दखल घेऊन त्यांना स्वामी विवेकानंद राज्यस्तरीय संस्कार रत्न पुरस्कार २०२० जाहीर केला. हा पुरस्कार संस्थेचे संस्थापक प्रा. किशोर रामगोपाल बुटोले यांनी चिंचवड येथील विश्वेश्वर ज्ञानदीप मंडळाच्या परिसरात मराठी चित्रपट अभिनेता श्री. प्रकाश भागवत ,संस्कार प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री मोहन गायकवाड व अनेक मान्यवरांच्या हस्ते स्वीकारला. पुरस्काराचे स्वरूप शाल, श्रीफळ, पुणेरी-पगडी व सन्मानपत्र असे होते.
