मोफत मोतियाबिंदू शस्त्रक्रिया शिबीर या योजने अंतर्गत एका निराधार गरजू रुग्णाच्या मोतियाबिंदू शस्त्रक्रिया शिबीराकरिता आपण रुपये २५००/- देणगी देऊन त्यास जीवन दृष्टी देऊ शकता (२)विकास किरण योजना या योजने अंतर्गत एका गरीब होतकरू विद्यार्थ्याला उच्च शिक्षणाकरिता शिर्षवृत्ती स्वरूपात दरवर्षी रुपये ५०००/- ५ वर्षाकरिता आर्थिक मदत केली जाते. आपण किमान एक विद्यार्थी या योजने करीता दत्तक घेऊन त्यास रुपये ५०००/- प्रमाणे ५ वर्षाकरिता शिर्षवृत्ती देऊन मदत करू शकता
"कस्तुरी चैरिटेबल सोसायटी" या संस्थेने अकोला शेगाव पायी वारीच्या मार्गावर स्वमालकीचे एक एकर शेत विकत घेतले असून त्यावर पायदळवारी करणाऱ्या वारकऱ्यांचे श्रद्धास्थान श्री संत गजानन महाराजांचे मंदिर उभारले आहे. मंदिरात येणाऱ्या वारकऱ्यांची अखंड सेवा संस्था करीत असून या वारकऱ्यांना संघटित करून समाजातील वंचित व दुर्बलांची सेवा विविध उपक्रमातून संस्था सातत्याने करीत आहे.
सेवाभावी उपक्रमाचा एक भाग म्हणून संस्थेने मंदिर परिसरात उभारलेली 'सेवासागर' वास्तू. या वास्तूत समाजातील उपेक्षित,वृद्ध-मातापिता यांच्या सेवेकरिता 'वृद्धाश्रम' व अनाथ बालकांकरिता 'अनाथाश्रम' यांचे माध्यमातून आजी आजोबा व नातवंडांचे सहजीवनाचा प्रकल्प 'आजोळ' १-जुलै-२०२० पासून प्रस्तावित आहे.
या शिवाय समाजातील वंचित व दुर्बलांची सेवा घडावी या हेतूने...(1) निराधार मातांकरिता ३००/- रु. पेन्शन देणारी 'पाखरं' योजना, (2) मोफत नेत्रतपासणी व मोतियाबिंदू शस्त्रक्रिया शिबिरे ,(3) पित्याचे छत्र हरविलेल्या कन्यांचे शिक्षण, रोजगार व विवाह इत्यादी जवाबदारी स्वीकारणारी दत्तक पालक योजना, (4) भर उन्हाळ्यात उन्हाची दाहकता कमी करण्यासाठी कामगारांना व रिक्षाचालकांना मोफत दुपट्टा वितरण ,(5) हिवाळ्यात गोर गरिबांना गरम कपडे व ब्लेंकेटचे वितरण. (6) रस्त्याच्या कडेला व शहरातील मंदिर परिसरात वास्तव्यास असणाऱ्या अनाथांची दिवाळी इत्यादी सेवाभावी उपक्रम संस्था स्थापनेपासूनच सातत्याने राबवित आहे.
संस्थेचे संस्थापक प्रा. किशोर रामगोपाल बुटोले व त्यांचे सहकारी सातत्याने अकोला शेगाव पायदळ वारी करीत असत. त्याच प्रमाणे श्री क्षेत्र आळंदी ते पंढरपूर पायदळ वारी त्यांना श्री संत गजानन महाराज व परमात्मा पांडुरंगाच्या कृपेने घडली. या वारीच्या मार्गातच त्यांना समाजातील उपेक्षित व दुर्बलांची सेवा व सत्संग सदा घडावा याची प्रेरणा झाली म्हणून संतांचे आशीर्वाद सातत्याने मिळून हे पारमार्थिक कार्य पुढे चालू राहावे या करीता 'कस्तुरी ' दरवर्षी परिसरातील श्री संत गजानन महाराजांच्या मूर्तीच्या वर्धापनदिनी राज्यातील एका संत श्रेष्ठाची निवड करून त्यांना राज्यस्तरिय 'कस्तुरी भूषण ' व महिला संतांची निवड करून त्यांना 'कस्तुरी रत्न ' हा पुरस्कार देऊन सन्मानित करत असते . त्याच प्रमाणे निस्वार्थ सेवाभाव असणाऱ्या एका शिक्षकाची निवड करून त्यास 'कार्यगौरव पुरस्कार ' प्रदान करण्यात येतो