पाखर योजना

या योजनेकरिता आपण ३००००/- देणगी देऊन एक ज्येष्ठ माता दत्तक घेऊ शकता. या राशीतून प्राप्त व्याजातून दरमहा एका मातेस ३०० रुपये मासिक पेन्शन अदा करण्यात येईल.





विकास किरण योजना

या योजने अंतर्गत एका गरीब होतकरू विद्यार्थ्याला उच्च शिक्षणाकरिता शिर्षवृत्ती स्वरूपात दरवर्षी रुपये ५०००/- ५ वर्षाकरिता आर्थिक मदत केली जाते. आपण किमान एक विद्यार्थी या योजने करीता दत्तक घेऊन त्यास रुपये ५०००/- प्रमाणे ५ वर्षाकरिता शिर्षवृत्ती देऊन मदत करू शकता.

अनुबंध योजना

या योजनेत आपण आपल्या वाढदिवशी रु. ११००/- अकरा वर्षाकरिता देण्यात संकल्प करू शकता. या योजनेतून प्राप्त राशीचा विनियोग वृद्धाश्रमातील निवासी वृद्धांच्या सेवेकरिता करण्यात येईल.




अन्नपूर्णा योजना

या योजनेत आपण दरमहा १०० /- रु. ५ वर्षाकरिता देण्याचा संकल्प करू शकता. या योजनेतील प्राप्त राशीचा विनियोग कस्तुरी परिसरातील वारकऱ्यांच्या सेवेकरिता करण्यात येईल.




अखंड नंदादीप योजना

या योजनेत आपण दरवर्षी शुभदिनी रु. १००१/- देणगी देऊ शकता . या योजनेतील प्राप्त राशीचा विनियोग कस्तुरी परिसरातील मंदिर सेवेकरिता करण्यात येईल.





वारकरी सेवा

या योजनेत दर एकादशीला वारकऱ्यांच्या सेवेकरिता रु. २१०० /- व चतुर्थीला वारकऱ्यांच्या सेवेकरिता रु. ११००/- देणगी देऊन आपण वारकऱ्यांची सेवा करू शकता .





वृद्ध मातापिता पालक योजना

या योजनेत एक वृद्ध माता/पिता यांच्या भोजन ,वस्त्र व आरोग्य सेवार्थ एका वर्षाकरिता देणगी रु. २१०००/- देऊन दत्तक घेऊ शकता.

मोफत मोतियाबिंदू शस्त्रक्रिया शिबीर

या योजने अंतर्गत एका निराधार गरजू रुग्णाच्या मोतियाबिंदू शस्त्रक्रिया शिबीराकरिता आपण रुपये २५००/- देणगी देऊन त्यास जीवन दृष्टी देऊ शकता