सेवासागर

'कस्तुरी' परिसरात सोमवार दि. १ मे २०१७ रोजी आजी-आजोळ नातवंड ह्यांच्या सहजीवनाचा प्रकल्प आजोळ करिता 'सेवासागर' या वास्तुचा लोकार्पण सोहळा आणि 'वारकरी भवन व भक्तनिवास' या नियोजित वास्तुचा भूमिपूजन सोहळा प.पू.श्री जितेन्द्रनाथ महाराज (श्री देवनाथ महाराज मठ, पिठाधिश्वर, सुर्जी अंजनगांव जि.अमरावती) यांच्या अध्यक्षतेखाली आणि मा.ना. डॉ. रणजीत पाटील (राज्यमंत्री तथा पालकमंत्री अकोला जिल्हा) मा.आ.श्री गोपीकिसन बाजोरीया, मा.श्री वसंतराव खोटरे (माजी आमदार) ,मा. श्रीमती जोत्सनाताई चोरे (जि.प.सदस्या) ,मा. सौ. उज्वलाताई देशमुख (माजी महापौर) ,ह.भ.प. श्री लक्ष्मीनारायणजी दायमा, ह.भ.प. श्री नाना उजवणे, मा. श्री सिध्दार्थ शर्मा (कार्याध्यक्ष, मराठी पत्रकार परिषद मुंबई) ,प्रा.श्री नितीन बाठे (अध्यक्ष, श्री समर्थ शिक्षण व क्रिडा प्रसारक मंडळ, अकोला) व मा.श्री दिपक भरतिया (वसंत अ‍ॅग्रोटेक इंडस्ट्रीज,अकोला) यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. त्याप्रसंगी घेतलेली क्षणचित्रे.

सोमवार, १ मे २०१७ सुर्जी अंजनगांव जि.अमरावती





वारकरी

कस्तुरी परिसरातील श्री संत गजानन महाराज मंदीरामधील विविध अध्यात्मिकय सेवाभावी उपक्रम, शेगाव संस्थानी श्रींची दरवर्षी पंढरपूरला जाणारी पालखी व शेगावाला श्रींच्या दर्शनासाठी पायी जाणाऱ्या विविध पालख्या व दिंड्यांतील वारकऱ्यांना संस्थेद्वारे विविध सेवा पुरविल्या जातात. त्या प्रसंगी आणि काही ठळक घडामोडी प्रसंगी घेतलेली क्षणचित्रे.

अकोला जि.अमरावती




व्याख्यानमाला

'कस्तुरी दरवर्षी अकोला शहरातील नागरिकांचे समाज प्रबोधनाच्या हेतूने त्रिदिवशीय 'कस्तुरी व्याख्यानमाला चे आयोजन करत असते. आपातापायेथील कर्मयोग परिवाराचे वै. सौ. सुनंदाताई शा. बुटे वारकरी शिक्षण विद्यालय व या संस्थेचे मार्गदर्शक प्रा. डॉ. शांताराम बुटे यांचेकडून दरवर्षी रु.१५000/-चे अर्थसहाय्य प्राप्त होणारी ही व्याख्यानमाला. या व्याख्यानमालेत महाराष्ट्रातील अनेक नामवंत वक्त्यांनी समाज प्रबोधन केले आहे. काही व्याख्यानमाला प्रसंगी घेतलेली क्षणचित्रे..

अकोला अकोला




कस्तुरीच्या 'पाखर' (निराधारांना पेन्शन) योजनेच्या मानकरी

समाजातील ज्येष्ठ व निराधार मातांना स्वाभिमानाने जगण्यास मदत करण्यासाठी कस्तुरीची पाखर' योजना अस्तित्वात आली असुन या योजनेअंतर्गत निवड झालेल्या मातांना दरमहा रु. ३00/- मासिक पेन्शन आजीवन देण्यात येते. या योजनेअंतर्गत कमाल ५० निराधार महिलांना मासिक पेन्शन देण्याचा कस्तुरीचा मानस असुन त्याकरिता समाजसेवी बांधवांना मदत करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

अकोला अकोला





कस्तुरीच्या 'विकास किरण' ( उच्च शिक्षणाकरिता आर्थिक मदत) योजनेच्या मानकरी

समाजातील आर्थिक दृष्ट्या सक्षम नसलेल्या होतकरू विद्यार्थ्यांना शिक्षणाकरिता आर्थिक मदत देवून त्यांना स्वावलंबी व स्वाभिमानी बनविण्याची ही योजना आहे.शासकीय अध्यापक महाविद्यालय, बुलढाणा येथे कार्यरत ज्येष्ठ प्रा. डॉ. रोहिणी विकास तडस यांनी त्यांचे पती श्री विकास भीधरराय तडस याच्या स्मृतीत कस्तुरीला दिलेल्या अर्थसहाय्यातून हि योजना राबविली जात आहे. स्व. विकास श्रीधरराब तडस हे अकोला जिल्हा परिषद शिक्षण विभागात उपशिक्षणाधिकारी (माध्यमिक) या पदावर कार्यरत होते. समाजातील बांधवांना शिक्षणाकरिता आर्थिक मदत करण्याकरिता ते सतत तत्पर असायचे, त्यांनी घेतलेला वसा यापुढेही चालु राहावा या उद्देशाने अस्तित्वात आलेल्या योजनेचा लाभ अनेक होतकरू विद्यार्थ्यांनी घेतला आहे.

अकोला अकोला





मोफत नेत्रतपासणी व मोतीबिंद शस्त्रक्रिया शिबीर

कस्तुरी व दम्माणी नेत्र रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने स्व. विकास श्रीधरराव तडस यांच्या स्मृती प्रित्यर्थ दरवर्षी ७ ऑक्टोबर रोजी मोफत नेत्रतपासणी व मोतीबिंद शस्त्रक्रिया शिबीराचे आयोजन करण्यात येते. या शिबिराकरिता प्रा. डॉ. श्रीमती रोहिणी तडस यांच्याकडुन रु.२५०००/- दरवर्षी अर्थसाहाय्य प्राप्त होत असते. शिबीर प्रसंगी घेतलेली क्षणचित्रे,

दरवर्षी ७ ऑक्टोबर रोजी अकोला अकोला