ऎसी कळवळीयाची जाती । करी लाभावीण प्रिती ।।
अशा उदात्त भावनेतून समाजातील वंचित व निराधार आणि पायदळ वारी करणाऱ्या वारकऱ्यांची सेवा घडावी या हेतूने प्रा. किशोर रामगोपाल बुटोले यांच्या नेतृत्वाखाली अकोला शहरातील वारकरी समूहाने 'कस्तुरी चॅरिटेबल सोसायटी' या संस्थेची दिनांक २१/०७/२०१० रोजी आषाढी एकादशीच्या पर्वावर स्थापना केली. माननीय सहाय्यक धर्मादाय आयुक्त, अकोला यांनी या संस्थेची रितसर नोंदणी केली असून नोंदणी क्र. F/१४१९६ आहे.
समाजातील वंचित व निराधार आणि वारकरी हे संस्थेच्या सेवेचे केंद्रस्थानी असून त्यांच्या उत्थानाकरिता संस्था सातत्याने विविध सेवाभावी उपक्रम राबवित आहे.
संस्थेने अकोला शेगाव पायी वारी च्या मार्गावर अकोल्यापासून ५ किमी अंतरावर एक एकर शेत विकत घेऊन त्यावर श्री संत गजानन महाराजांचे भव्य मंदिर उभारले आहे. श्रींच्या मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या भक्तांना व समाजसेवी आणि दानशूर व्यक्तींना संघटित करून या परिसरात एक 'सेवासागर ' या वास्तूचे निर्माणकार्य केले असून या वास्तूत निराधार आजी आजोबा व नातवंड यांच्या सहजीवनाचा संबंध निर्माण करणारा 'आजोळ' प्रकल्प प्रस्तावित आहे.
When we give cheerfully and accept gratefully, everyone is blessed.
There is no exercise better for the heart than reaching down and lifting people up.
It's not how much we give but how much love we put into giving.
It is more difficult to give money away intelligently than to earn it in the first place.
Every good act is charity. A man's true wealth hereafter is the good that he does in this world to his fellows.
You give but little when you give of your possessions. It is when you give of yourself that you truly give.